शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी ताकद दाखवून देतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:54 IST

चंदगड : देशभरातील शेतकऱ्यांसाठी काम करणाºया २०४ संघटनांना एकत्र करून त्यांच्या जोरावर संसदेत शेतकºयांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे व ...

चंदगड : देशभरातील शेतकऱ्यांसाठी काम करणाºया २०४ संघटनांना एकत्र करून त्यांच्या जोरावर संसदेत शेतकºयांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे व पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होवू नये, यासाठी शेतमालाला दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे, असे विधेयक संसदेत मांडणार आहे. हे विधेयक मंजूर झाले नाही, तर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी आपली ताकद दाखवून देतील, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे आयोजित शेतकºयांच्या मेळाव्यात शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरंपच विष्णू गावडे होते.शेट्टी म्हणाले, गुजरात राज्यासारखी एफआरपी तीन टप्प्यांत देण्याचा विचार सरकारचा आहे, असे उद्गार सहकारमंत्र्यांनी काढून शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. कायद्यानुसार एकरकमी रक्कम घेणार असून, जो कारखानदार सरकारची बाजू घेईल त्याला उसाचे दांडके दाखवू. देशातील व राज्यातील भाजपचे सरकार हे लबाड विद्वानांचे सरकार आहे. हिशोबात हे सरकार हुशार असल्याने ते शेतकºयांना हिशोबत फसवत आहेत. उसाच्या एफआरपीत २०० रूपये वाढ केली व त्यातील १८७ रूपये काढून घेतले. तोडणी वाहतूक हिशोबातील प्रतिटन ९७ रूपये शेतकºयांना तोट्यात घालण्याचे पापही या सरकारने केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी सरकारवर केला.राजेंद्र गड्यान्नावर म्हणाले, गतवर्षीच्या उसाचा दर आम्ही तुमच्याकडे येऊन मागण्यापूर्वी तुम्ही जाहीर केला आहे. त्यामुळे तो द्यावाच लागणार आहे. न देता पाताळात जरी जावून बसलात तरी शोधून तुम्हाला द्यायला भाग पाडणार आहे.भगवान काटे म्हणाले, उसाची कोंडी ही सोन्याची कांडी आहे हे सांगण्याचे काम संघटनेने केले आहे. संघटना पहिल्यांदा सावध करते, नाही तर बुडका हातात घेते. त्यामुळे दर निकालात निघल्याशिवाय कारखाने चालू करू नका.प्रा. दीपक पाटील यांनी प्रास्ताविकात शेतकºयांच्या उसाचे थकीत पैसे मिळावेत व चालू हंगामातील एफआरपी ठरविण्यासाठी हा मेळावा आयोजित केल्याचे सांगितले.यावेळी माजी सभापती जगन्नाथ हुलजी, सरपंच राजू पाटील, विश्वनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. २७ तारखेला जयसिंगपूर येथे होणाºया ऊस परिषदेस प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.यावेळी बाळाराम फडके, राजू व्हटकर, बी. डी. पाटील, सतीश सबनीस, मारूती मेणसे, अरूण पाटील, सुस्मिता पाटील, टी. जी. पाटील, निगाप्पा मलखांबकर, सुरेश कुट्रे उपस्थित होते. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.हुमणी म्हणजे काय..?खासदार शेट्टी यांनी एका शेतकºयाने राज्याच्या प्रभारी कृषीमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे उसावर हुमणी पडल्याने काय तरी मदत करा, अशी मागणी केली. त्यावर कृषीमंत्र्यांनी हुमणी म्हणजे काय, असा सवाल केला. अख्ख्या महाराष्ट्रात हुमणीने धुमाकूळ घातला असताना कृषीमंत्र्यांना हुमणी म्हणजे काय, हे माहीत नाही, मग हे शेतीची धोरणे कसे ठरविणार, असा सवालही शेट्टींनी यावेळी केला.